वडगांव दि. ८ - वडगाव येथील भाजपा कार्यालयामध्ये राज्याचे मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली देशालाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त "हर घर तिरंगा अभियान " नियोजन संपूर्ण मावळ तालुका मध्ये नियोजन अभियान यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती गण व जि. प.गट निहाय नियोजन करण्यात आले व तशा प्रकारची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे.
०९ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान तालुक्यातील असणारे माजी सैनिक हर घर तिरंगा या अभियानाचे तालुका संयोजन गुलाबकाका म्हाळसकर यांनी अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली त्यामध्ये दि.०९ ऑगस्ट ते ११ऑगस्ट या दरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील माजी सैनिक,कलाकार,खेळाडू,समाजसेवक यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तिरंगा ध्वज भेट देऊन देशाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षाचे महत्व विशाद करायचे आहे.
दिनांक १२ ऑगस्ट रोजी तिरंगी रॅलीचे आयोजन करून संपूर्ण तालुका तिरंगामय करावा असे आवाहन करून तिरंगा ध्वज उभा करताना तो प्लास्टिक, कागदी,नसावा तसेच ध्वजाचा केसरी भाग वरील बाजूस असावा अशी माहिती दिली दि.१२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तिरंगा रॅलीच्या नियोजनाबद्दल मावळ तालुका भाजपा युवा मोर्च्या व विद्यार्थी आघाडी च्या वतीने होणाऱ्या तिरंगा रॅली नियोजनाची तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीपजी काकडे यांनी माहीती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,यांनी केले व यादव सोरटे यांनी आभार मानले.
या वेळी उपस्थितामधे मा.उपसभापती शांताराम कदम, सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,प्रदीप हुलावळे,अर्जुन पाठारे,गणेश ठाकर,सुभाष धामणकर,नामदेव वारींगे, रवी आंद्रे,प्रवीण शिंदे,विकास लिंभोरे,विठ्ठल तुर्डे,दिनेश ढोरे,माऊली आडकर,रविभाऊ शेटे,नितीन कुडे, अक्षय भेगडे,शिवांकुर खैर,सचिन येवले,सागर येवले,सचिन पांगारे, हरिभाऊ दळवी,अक्षय म्हस्के,राजाराम असवले,संतोष असवले, सचिन कदम, दत्ता पडवळ,बबलु सुर्वे,रमेश बच्चे,संदिप पोटफोडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या