गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
मावळ - मावळ तालुक्यामध्ये गुरु पौर्णिमा निमित्त विविध ठिकाणी संत ,महात्मे, कीर्तनकार ,विद्वान यांना भारतीय जनता पार्टी मावळ वतीने सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन मंडळस्थानी ,गाव, शक्ति केंद्र , बुथ स्तरावर वर करण्यात आले होते .
तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. संघ सरसंघचालक सुरेशभाई शहा, यांचा सन्मान करण्यात आला तसेच कुजगाव खु" येथे वैराग्यमूर्ती चव्हाण महाराज यांना सन्मान भाजपा अध्यक्ष भरत रानवडे ,नवनाथ लालगुडे, अनिल गायकवाड , श्री दत्त मंदिर कमिटी यांच्याकडून करण्यात आला.
याप्रसंगी तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक दाभाडे, कार्याध्यक्ष स्वप्निल भेगडे, सरचिटणीस आनंद पुर्णपात्रे, अतिश रावळे, उपाध्यक्ष सतिश पारगे, अनिल शेलार, बाळासाहेब कडुसकर, प्रसिद्ध प्रमुख नामदेव मदने, कामगार आघाडी सोशल मीडियाचे सदस्य संजय पवार, तळेगांव दाभाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते...
प्रदेश कार्यालयातून संत, महात्मे ,विद्वान यांचा सन्मान करण्याच्या सूचना आल्या होत्या त्यानुसार विविध स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले - रवींद्र भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष
0 टिप्पण्या