Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे शौचालय उद्धघाटन व डिजिटल संच भेट.....

दिनांक : १८ जून २०२२, शनिवार.
कान्हे : दिनांक १८ जून २०२२ रोजी जिल्हा परिषद शाळा नायगाव शौचालय उद्धघाटन व डिजिटल संच भेट  देण्यात आले  रोटरी क्लब ऑफ निगडी रोटरी क्लब यांच्या सौजन्याने डिजिटल संच जिल्हा परिषद शाळा नायगाव यांना भेट देण्यात आला त्या साठी यशस्वी पाठपुरावा ग्रा प सदस्य  सदींप ओव्हाळ यांनी केला यावेळी कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ निगडी चे बोर्ड ऑफ डायरेक्टर जगमोहन सिंग व सर्विस डायरेक्टर अंकाजी पाटील यांच्या हस्ते सौचालया चे उद्घाटन करण्यात आले यावेळी जगमोहन सिंग म्हणाले की शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव मदत करत राहू असे मत व्यक्त केले या कार्यक्रमास उपस्थित कान्हे नायगाव प्रथम लोकनियुक्त आदर्श सरपंच विजय वामन सातकर  ग्रा पं सदस्य संदीप  ओव्हाळ ग्रा पंचायत सदस्य सुनील चोपडे ग्रा प सदस्य  आरीफ मुलानी  तसेच शाळेतील सर्व शालेय समिती पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होता 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली लोंढे मॅडम यांनी केले
तसेच आलेल्या पाहुण्यांचे प्राथमिक स्वरूपात स्वागत जगताप मॅडम यांनी केले
 . सन्माननीय व्यक्तींचे आभार व्यक्त  करत असताना ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ चोपडे म्हणाले की विद्यार्थी व शाळेच्या समस्या लक्षात घेऊन आज आपण जी मदत केली तर त्याचा शाळेला नक्कीच खूप मोठा फायदा होईल असे मत मांडले विशेष म्हणजे शौचालय व डीजल संच यासाठी विशेष प्रयत्न ग्रामपंचायत सदस्य संदीप ओव्हाळ यांनी केले  आसेही  त्या वेळी बोलले कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या