Ticker

6/recent/ticker-posts

काली डॉक्युमेंंट्री फिल्मचे आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित करणाऱ्या फिल्ममेकर लीना मणिमेकलई आणि कालीमातेविषयी वादग्रस्त खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा - भाजपा तळेगाव दाभाडे शहर ....

तळेगांव - हिंदु धर्मातील आराध्य दैवत कालीमातेविषयी डॉक्युमेंंट्री फिल्म "काली" मध्ये वादग्रस्त व आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित करणाऱ्या फिल्ममेकर लीना मणिमेकलई आणि कालीमातेविषयी वादग्रस्त व आक्षेपार्ह 
वक्तव्य करणाऱ्या पश्चिम बंगालमधील  लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांच्यामुळे देशभरातील हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या भावना अतिशय तीव्र स्वरुपाच्या आहेत.या जनभावनांचा विचार करुन लीना मणिमेकलई व महुआ मोईत्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन श्री.अंशु कुमार प्रेम (पाठक) अध्यक्ष- भाजपा उत्तर भारतीय आघाडी त.दा.शहर यांच्या नेतृत्वाखाली तळेगांव दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.नितीनजी लांडगे साहेब यांना तळेगांव दाभाडे शहर भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या वतीने देण्यात आले.

 याप्रसंगी तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री.रविंद्र बाळासाहेब माने,नगरसेविका सौ.शोभाताई भेगडे,सरचिटणीस श्रीमती रजनीताई ठाकुर,तळेगांव दाभाडे शहर भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष श्री.अशोकभाऊ दाभाडे,कार्याध्यक्ष श्री.स्वप्निल भेगडे,  सरचिटणीस श्री.आतिष रावळे,उपाध्यक्ष श्री.सतिशभाऊ  पारगे,तळेगांव दाभाडे शहर भाजपा सोशल मीडियाचे अध्यक्ष श्री.उपेंद्रजी खोल्लम,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल,भाजपा उत्तर भारतीय आघाडी उपाध्यक्ष श्री.नरेश मिश्राजी हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या