राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या जागेसाठी भाजप कडून धनंजय महाडिक यांचेही नाव रविवार( दिनांक 29 रोजी) जाहीर करण्यात आले आहे.
या घोषणेमुळे आता सहाव्या जागेसाठी चुरसेची लढाई पाहायला मिळणार आहे. सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोर लावला जाईल तसेच मताची आकडेमोड पाहता भाजपचे दोन उमेदवार केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे हे हमकास निवडून येतील तर दुसरीकडे महाविकास आघाडीने चार जागा एकत्र लढले तर मित्र पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे .परंतु जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर धनंजय महाडिक यांचा रूपाने प्रबळ आव्हान दिले जाऊ शकते.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा विस्तार करण्यासाठी धनंजय महाडिक यांची मोठी मदत होऊ शकते या कारणामुळे तिसरा उमेदवार म्हणून पक्षाची त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या