Ticker

6/recent/ticker-posts

भारतातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीला आता परदेशी प्रेक्षकांचीही हजेरी!..महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीची आता ‘ग्लोबल क्रेझभारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आता ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास करताना दिसत आहे.

भारतातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीला आता परदेशी प्रेक्षकांचीही हजेरी!

महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीची आता ‘ग्लोबल क्रेझ

भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आता ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास करताना दिसत आहे. महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ पाहण्यासाठी विदेशी प्रेक्षकांनी हजेरी लावली. नेदरलँडमधील तीन प्रेक्षकांनी घाटात उपस्थित राहून बैलागाडा शर्यतींचा थरार अनुभवला.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे बैलगाडा शौकींनांसह सर्वसामान्य नागरिकांनी रामायण मैदानावर मोठी गर्दी केली होती. चाकण औद्योगिक पट्टयातील जीकेएन एरोस्पेस कंपनीचे संचालक असलेली तीन विदेशी नागरिक बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिले. मार्टिन दुर्विले, जोस्ट दुर्विले आणि युस्ट कम्पहुइस अशी तिघांची नावे आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्रीय फेटा बांधून स्वागत करण्यात आहे. पाहुण्यांना अगदी वाजत-गाजत घाटात आणण्यात आले. उपस्थित श्रोत्यांनी जल्लोष करीत विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले.
मार्टिन दुर्विले म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी बैलगाडा शर्यत मी प्रथमच अनुभवत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आमचा सन्मान केला. या सन्मानाने आम्ही भारावून गेलो. इथली संस्कृती आम्हाला भावते. बैलांप्रति इथल्या लोकांना असलेला जिव्हाळा कौतुकास्पद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या