Ticker

6/recent/ticker-posts

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निवासी बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीर यशस्वीपणे संपन्न ...श्रीमंत रमेशसिंहजी व्यास यांचेतर्फे मंडळाला समाजाच्या सेवेसाठी रूग्णवाहिका लोकार्पण...maval taluka varkari mandal shibir



 मावळ- वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने दिनांक ५ मे, २०२२ ते २० मे, २०२२ या कालावधीत निवासी बालवारकरी अध्यात्मिक संस्कार शिबीर साई सेवा धाम कान्हे फाटा येथे यशस्वीपणे संपन्न झाले. मंडळामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या संस्कार शिबीरात विद्यार्थ्यांना  योगा, मृदग वादन, गायन, हरिपाठ यांचे धडे देण्यात आले. दिनांक 20 मे,2022 रोजी  ह.भ.प.विष्णू  महाराज खांडेभराड (आळंदी ) यांचे कीर्तनाने या शिबीराची सांगता झाली. सुमारे 100  विद्यार्थी- विद्यार्थीनींनी याचा   लाभ घेतला.
          यावेळी राजस्थान वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष, मंडळाचे आधारस्तंभ, ए-वन चिक्की चे डायरेक्टर  ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंहजी व्यास यांचेतर्फे मंडळाला समाजाच्या सेवेसाठी रूग्णवाहिका देण्यात आली. हा लोकार्पण सोहळा महाराज श्री परमवीरसिंहजी( दांतस्टेट गुजरात)  यांचे हस्ते संपन्न झाला.         
          या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी शिबीरातील बालवारकरी यांनी वारकरी  वेषात दिंडी काढून कीर्तनाला साथ दिली.
    या १५ दिवसांच्या शिबीरात    विद्यार्थ्यांना गायनाचार्य  किरणजी  परळीकर , योगगुरू अरूणजी येवले ,  व्याख्याते विवेक गुरव सर , योगाचार्य विवेक तिवारी, आळंदी येथील ह.भ.प.मुकुंद कुलकर्णी, मनशक्ती च्या  
भानुमती सुनिल वैद्य  आणि सुनिल भानुदास वैद्य यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच विशेष सहकार्य  राधा कल्याणदास दर्यानानी ट्रस्ट, कान्हे यांचे मिळाले.
यावेळी  माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे, देवराईचे अध्यक्ष सुकनशेठ बाफना, नितीन घोटकुले( मा.सभापती), ह.भ.प. सुखदेव महाराज ठाकर, संतोषशेठ   कुंभार (पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळ), एकनाथ शेटे( मा.उपसरपंच, नवलाख उंब्रे), ह.भ.प.मंगलमहाराज जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
       मावळ तालुका वारकरी  सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार  भसे , उपाध्यक्ष  दिलीप वावरे ,सचिव रामदास पडवळ, मंडळाचे  खजिनदार  भरतशेठ  येवले, सुनिल महाराज वरघडे,  कार्याध्यक्ष  शिवाजी पवार , सहखजिनदार सुभाषमहाराज  पडवळ , कायदेशीर  सल्लागार अॅड. सागर एकनाथ शेटे , मार्गदर्शक महादु नवघणे, नितीन आडीवळे, बजरंग  घारे ,पंढरीनाथ शेटे , शांताराम  लोहर , आंदरमावळ  विभाग अध्यक्ष दिपक  वारिंगे  पदाधिकारी  संभाजी  कराळे, विभाग प्रमुख निलेश प्रकाश शेटे, भिवाजी गायखे,   मुकूंद  ठाकर , डाॕ.सर्जेराव गिरवले, डाॕ.अमित वाघ, दत्ता केदारी, अभिमन्यू प्रकाश शिंदे,( मा.सरपंच कामशेत), योगेशशेठ काकरे, समीर जाधव( सरपंच, गोळेवाडी), योगेश  मोकाशी , समीर ठाकर  , शांताराम  गायखे ,  व्दारकानाथ  देशमुख , लक्ष्मण  येरम,  विवेक तिवारी आदी  उपस्थित होते.
 कार्यक्रम  व शिबीराचे यशस्वितेसाठी   बालवारकरी आध्यात्मिक  संस्कार  शिबीराच्या  नियोजन समितीचे  अध्यक्ष ह.भ.प.शांताराम  गायखे , उपाध्यक्ष  रोहिदास जगदाळे , सचिव बळवंत येवले ,  सदस्य भाऊ रासे , सुखदेव गवारी , रोहिदास खांडेभरड , मोहन कदम , सोमनाथ सातपुते , सखाराम घनवट , रामचंद्र कालेकर ,  सोमनाथ  सावंत , बाळासाहेब  देशमुख , सुरेश भांगरे , दत्ताञेय  घोजगे , नाना  घोजगे , चंद्रकांत  सातकर, सदाशिव विकारी ,  बाळासाहेब  राजिवडे ,  वारकरी  सेवा समिती अध्यक्ष देवराम सातकर  यांनी  परिश्रम घेतले.   
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे  सचिव रामदास पडवळ  यांनी केले , ए.वन चिक्की व्यवस्थापक  मोहब्बतसिंग  राजपुरोहीत यांनी मनोगत  व्यक्त केले.  सूञसंचालन  मंडळाचे  उपाध्यक्ष  दिलीप वावरे यांनी केले; तर आभार कायदेशीर सल्लागार  अॅड. सागर एकनाथ शेटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या