मावळ - भारतीय जनता पक्ष वडगाव कार्यालय मध्ये भारतीय जनता पक्षाचे क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी तेथील बांधवांसाठी टी शर्ट वाटण्यात आले.
भाजपा वडगाव पक्ष कार्यालय मध्ये नामदेव वरिंगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मावळ तालुका प्रभारी भास्करआप्पा म्हाळसकर, ज्येष्ठ नेते एकनाथ टिळेकर , युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, सरचिटणस सुनील चव्हाण, रामदास अल्लम यांनी त्यांना कार्याबद्दल स्तुती करत शुभेच्छा दिल्या.
तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रम येथे फळे वाटप करण्यात आली यावेळी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, संघटनमंत्री यादव सोरटे, मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या