Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधे कानिफनाथ महाराज उत्सव साजरा...

कामशेत - कामशेत मध्ये कानिफनाथ महाराज उत्सव  साजरा करण्यात आला. आज फाल्गुन शुद्ध पंचमी या दिवशी कानिफनाथ महाराज यांनी समाधी घेतली.

             आजच्या दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्त कामशेत  गावठाण मधिल कानिफनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात.या निमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रम होत असतात.सोमवार दिनांक २९ रोजी कामशेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचा हस्ते गणेश पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली या नंतर अभिषेक, होमहवन, आरती,महाप्रसाद ,दिनांक २२ रोजी भजन गजरात पालखी मिरवणुक काढण्यात आली. सायं ६ ते ७ हभप बाळासाहेब मालपोटे याचे प्रवचन झाले. या दिवशी महिलांना मंदीर गाभाऱ्यात प्रवेश असल्याने पंचक्रोशीतील महिला भगिनींनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी तालुक्यातील तसेच गावातील अनेक पदाधिकारी मान्यवर कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे आयोजन कै. भरत शिनगारे शिंनगारे यांचे भक्त गण तसेच ग्रामस्त यांच्या कडून करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या