कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तारीख पे तारीख या
वेळखाऊ धोरणाला वैतागून मारुंजी (मुळशी) येथील शेतकऱ्याने रागाच्या भरात एक एकर क्षेत्रातील उसावर अक्षरशः रोटर मशीन मारल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली.
किरण जगताप असे त्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी ऊसावर रोटर फिरवून सुमारे साठ हजारांचे नुकसान करून घेतले आहे. करखान्यातील अधिकाऱ्यांनी जानेवारीत शेवटच्या आठवाड्यातील तोडणीची तारीख दिली होती पाठपुरावा केल्यानंतर
पुन्हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ऊस तोडणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र फेब्रुवारी जाऊन अर्धा मार्च महिना संपला तरीही अधिकाऱ्यांची काहीच हालचाल दिसत नसल्याने जगताप स्वतः होऊन वारंवार त्यांना संपर्क करत होते
अखेर शुक्रवारी (ता. ११) परत एकदा
त्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ऊस तोडू असे आश्वासन मिळाल्याने जगताप संतापले. रागाच्या भरात थेट शेतात येऊन त्यांनी संपूर्ण ऊसावर रोटर फिरवरून ऊसाचा भुगा केला. मी अधिकाऱ्यांच्या
टोलवा टोलवीला अक्षरशः वैतागलो. निगरगट्ट
व निर्दयी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे काहीही घेणे दणे नाही त्यांना पुन्हा फोन करण्याची वेळ येऊ नये म्हणून ऊसावर रोटर फीरविला असे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खूप मोठे ऊसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे काही वेळा मागे पुढे होते. तारखेनुसार तोडणीचे काम चालते अधे-मधे कोणाचीही तोडणी करता येत नाही. जगताप हे आमच्या संपर्कात होते या आठवड्यात त्यांच्याकडे टोळी पाठवून तोडणी केली जाणारच होती.
- राजेंद्र वणवे
(शेतकी अधिकारी, श्री संत तुकाराम कारखाना)
0 टिप्पण्या