Ticker

6/recent/ticker-posts

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या विजयाचे शिल्पकार मा. राज्यमंत्री बाळा भेगडेयांचे आज तळेगांव नगरीत होणार जंगी स्वागत...

तळेगाव दाभाडे दि.११- उत्तर प्रदेश, मणिपूर ,गोवा, उत्तराखंड या चार राज्यांमधील भाजपाने मिळवलेल्या विजयाचा  तळेगाव दा. येथे आज.दि.११/३/२०२२ रोजी ५ वा.सुशीला मंगल कार्यालय येथे विजयोत्सव मिरवणूक होणार असुन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या विजयाचे शिल्पकार नामदार संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे
यांचे तळेगांव नगरीत जंगी स्वागत करत ढोल-ताशांच्या गजरात भव्य विजयी मिरवणुक लिंब फाटा तळेगाव दाभाडे येथून सुरु होणार आहे. 

      या वेळी प्रमुख उपस्थिती आमदार भीमराव  तापकिर जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,महिला तालुकाध्यक्ष सायलीताई बोत्रे, तळेगाव शहर अध्यक्ष रविंद्र माने यांच्या सह कार्येकर्ते ,सन्माननीय ज्येष्ठ नेते-आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहनार असल्याचे भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या