Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात कामशेत मधील इंद्रायणी कॉलनी जाणार पाण्याखाली !कुसगाव-कामशेत रोड येथील नैसर्गिक नाला केला बंद...

कामशेत दि.७- कामशेत येथील इंद्रायणी कॉलनी मधील कुसगाव - कामशेत मुंबई पुणे हायवे रोड जमिन सर्वे नंबर १३२,१३४,१३५ मधील नैसर्गिक नाला एका खाजगी व्यवसायिकाने बंद केल्या मुळे या वर्षी कामशेत मधील इंद्रायणी कॉलनी ही पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झालेली आहे.

        गेल्यावर्षी पावसाळ्यात इंद्रायणी कॉलनी मध्ये पाणी शिरकाव झाल्याने तेथे गुडघाभर पाणी जमा झाले होते .त्यामुळे तेथील नागरिच्या घरात पाणी शिरल्याने  मोठी तारांबळ उडाली होती परंतु आता हा नाला बंद केल्यामुळे डोंगर रांगा मधून येणारे पाणी  इंद्रायणी कॉलनी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव होण्याची भीती निर्माण होऊन तेथील नागरिकांच्या जिवितालाधोका निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी शेतकरी सुरेश धावडे याच्या शेतामधे पाणी येऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  या बाबत खडकाळे (कामशेत) ग्रामचंचायत यांना लेखी निवेदन दिले आहे .परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप  झालेली नाही. 

      ग्रामपंचायत व प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित यावर मार्ग काढावा असे अभिमन्यु शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या