Ticker

6/recent/ticker-posts

उत्तर प्रदेश-उत्तराखंड-गोवा-मणिपूर या ४ राज्यांमधील भाजपा विजयाचा कामशेत मधे विजयोत्सव....

कामशेत दि.१०-उत्तर प्रदेश-उत्तराखंड-गोवा-मणिपूर या ४ राज्यांमधील निवडणूकांमधे मधे भाजपा विजयाचा कामशेत मधे फटाके वाजवत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे चार राज्यात बहुमत घेऊन एक हाती सत्ता आल्याने कामशेट मधील भारतीय जनता पक्षाच्या  कार्यकर्त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष साजरा करत कार्यकर्त्यांनी नागरीकांना लाडू ,पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. 

       यावेळी ज्येष्ठ नेते शंकरनाना शिंदे ,भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, मा. अध्यक्ष वसंत काळे, कार्याध्यक्ष शंकर पिंगळे, विक्रम बाफना, व्यापारी आघाडी मा.अध्यक्ष विपिन बाफना, मा. सरपंच नितीन गायखे, उपाध्यक्ष बबलु सुर्वे ,मा.सरपंच अरुण ठाकर,कामगार नेते जितेंद्र चेतारा ,योजना दुत समिर भोसले,लहु गायखे, नवनाथ इंगुळकर,सुनिल शिंदे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या