कामशेत - कामशेत शहरात परिवर्तनाची नांदी असलेला एक गाव- एक शिवजयंती उत्सव सोहळा प्रेरणादायी ठरत आहे. आज कामशेत ची लोकसंख्या ही ३५ हजारांच्या वर आहेत यामध्ये विविध समाजातील लोक येथे वसलेले आहेत. समाजिक बांधिलकी जपत तरुणांनी एकत्रित येऊन ‘एक गाव-एक शिवजयंती’ हा नारा देत या वर्षीही गावातील प्रमुख तरुणांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली.
या वर्षी तिकोना किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यात आली. संध्याकाळी ६ वाजता. महाराजांची ढोललेझीम पथक वाजवत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली .या मध्ये बालकलाकारांनी महाराजांची वेशभूषा घालून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. महाराजांची आरती कामशेत शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.रात्री ९ वाजता शिवव्याख्याते श्रीकांत मेंढी यांचे व्याख्यान झाले.यावर्षीही मुख्य आकर्षक असलेले कामशेत शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांची पूर्ण कृती मूर्ती उभारण्यात आलेली होती.
या शिवजयंती उत्सवात कामशेत शहरातील सर्वच प्रभाग मधील तरुणांनी या मध्ये उत्साहाने सहभाग घेतला.या साठी पोलीस बांधवांनी विशेष सहकार्य केले.
0 टिप्पण्या