मावळ - ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ /सांगवी गावचे लोकनियुक्त सरपंच नागसेन ओव्हाळ यांना पुणे जिल्हा परिषद यांचा कडून आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.सरपंच नागसेन ओव्हाळ यांनी गावात अनेक शासकीय योजना गावात राबवल्या आहेत.
कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे ,कृषी व पशसंवर्धन सभापती मा बाबुराव आप्पा वायकर , पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे ,बांधकाम सभापती प्रमोद काकडे , समाजकल्याण सभापती सरिकाताई पानसरे, मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे व इतर मान्यवर या सर्वांच्या प्रमुख उपस्थीत देण्यात आला. यावेळी
उप सरपंच एकनाथ गाडे ,, ग्रामसेविका कल्याणी लोखंडे ग्रामपंचायत सदस्य अमित ओव्हाळ , प्रशांत ओव्हाळ पोपट गायकवाड, संतोष ओव्हाळ ,आविनाश ओव्हाळ मिलिंद ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या