Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मधे वाकसई-कुसगाव गटाच्या भाजपाच्या उमेदवारास निवडून आणण्याचा केला निर्धार ....


कार्ला दि.४- आगामी काळात होऊ घातलेले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची वाकसई-कुसगाव गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कमळ हाचं आमचा उमेदवार ! असे म्हणत उमेदवार कोणी असो भाजपला बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.


या बैठकीत उमेदवारी विषयी चर्चा करण्यात आली अंतिम निर्णय हा उमेदवारी कोणाला ही मिळो आपण कमळ हाच उमेदवार म्हणून भाजपला ह्या गटात निवडून आणण्याचा मानस करण्यात आला आणि मावळात भाजपच्या विजयाची सुरवात ह्यावेळी वाकसई, कुसगाव गट करेल असे प्रतिपादन अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.

या बैठकीला गटातील शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या