कामशेत दि.४-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भिमनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यातून जमा झालेला निधी हा आयोजक यांनी कामशेट मधील एकता निराधार संस्थेला मदत स्वरूपात रेशनिंग किराणा व खेळाचे साहित्य देण्यात आले . या वेळी एकता निराधार संघ यांच्या वतीने लिखित नाशिककर यांनी आयोजकांचे आभार मांडले.
या प्रसंगी कामशेट आरपीआय युवा अध्यक्ष रुपेश (सोनू) गायकवाड, कमलेश निकाळजे ,गुलशन रोकडे, अनिकेत ढवळे ,संग्राम केदारी ,सौरभ शिंदे ,अजय अहिरे, रोहन जाधव, आशिष गायकवाड, अनिकेत मानकर ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांनी हा आदर्श घेऊन गरजु व अनाथांना मदत करावी अशी विनंती भिमनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने करण्यात आली.
-----------------
0 टिप्पण्या