Ticker

6/recent/ticker-posts

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्य नोकरी महाउत्सव...


कामशेत -  जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन रविवार  दि.६/३/२०२२ रोजी सकाळी ९ ते सायं.६ वाजे पर्यत , शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पुणे- मुंबई जुना हाईवे लगत एचपी पेट्रोल पंपासमोर ,कामशेत येथे करण्यात आले आहे.  या नोकरी महोत्सवामध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या महिला तसेच तरूणांसाठी व प्रत्येकाच्या आवडी – निवडीनुसार नोकरी मिळण्यासाठी सुवर्ण संधी मिळणार आहे.

         "आत्मनिर्भर भारत" संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून प्रेरणा  मिळत असते. यातूनच प्रेरणा घेऊन संकल्प मावळ तालुक्यातील १०००० युवक - युवतींना रोजगार देण्याचा संकल्प जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी केला आहे.
        कोरोना जगाच्या तसेच देशाच्या अर्थचक्राला थोडी मरगळ आली आहे. महामारीनंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले त्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडील कामगार कमी केले. अशा परिस्थितीमध्ये नोकरी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.  हाच प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मा. नितीनभाऊ मराठे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम युवकांसाठी नवीन रोजगाराच्या नविन संधी िर्माण होणार्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या