Ticker

6/recent/ticker-posts

शासनाचा किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय हा तरुण पिढीला व्यासनाधिन बनवेल ..आर.पी.आय मावळ वतीने तहसीलदार यांना निवेदन....


मावळ दि.२- महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाईन किराणा मालाच्या दुकानातील विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात आरपीआय मावळ वतीने जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या निर्णयाच्या विरोधात मा. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देऊन निषेध केला.

हा निर्णय कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याच्या हीताचा नाही शिवाय तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. राजकीय व्यक्ती भागीदार असणाऱ्या  कंपनीचा लाभ करण्याच्या हेतूने या निर्णय घेतलेला असून आम्ही त्याचा विरोध करतो असेही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
   या वेळी सूर्यकांत वाघमारे (पुणे जिल्हा अध्यक्ष आरपीआय), लक्ष्मण भालेराव (मावळ तालुका अध्यक्ष), समीर जाधव (युवक संपर्कप्रमुख पुणे जिल्हा), नागेश ओव्हाळ (सरपंच), अतुल सोनवणे संघटक पुणे जिल्हा, संतोष कदम (युवक अध्यक्ष मावळ तालुका), भावना ओव्हाळ (मावळ तालुका अध्यक्ष),अशोक केदारी (उपाध्यक्ष मावळ तालुका) किसन आहिरे (सरचिटणीस मावळ तालुका) नितीन ओव्हाळ अध्यक्ष कामशेत, रुपेश(सोनु)गायकवाड (युवक अध्यक्ष कामशेत), सुभाष भालेराव, विजय जाधव,संजय वाघमारे, विकास शिंदे, भरत मोरे, चंद्रकांत गायकवाड, महेंद्र वंजारे ,संतोष गायकवाड, आदी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.
_______________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या