Ticker

6/recent/ticker-posts

मावळ भा.ज.पा.वतीने बुथ स्थरीय घेण्यात आलेल्या "मन कि बात " या कार्यक्रमाला सर्वत्र प्रतिसाद...

मावळ दि.३१- भारतीय जनता पार्टी वतीने मावळ तालुक्यातील पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व गाव स्तरावर कार्य करणारे सर्व जेष्ठ,युवा कार्यकर्ते यांनी आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र भाई मोदी साहेब यांचा   *मन कि बात* अपेक्षित असलेल्या सर्वच बूथ स्तरावर मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला.

            येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार मोठ्या ताकदीने करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत *आपलं मावळ आपलं कमळं* चा नारा देऊन सर्वच्या सर्व उमेद्वारानां विजयी करण्यासाठी आत्तापासून सर्वजण एकजीवाने जोमाने कार्य करून पुन्हा एकदा आपल्या मावळ तालुक्याला एक सुसंस्कृत असा भारतीय जनता पार्टी चा आमदार देण्याकडे विजयी वाटचाल सुरू करू असाही संकल्प या वेळी करण्यात आला.

         मन कि बात कार्यक्रम घेण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे तालुकाध्यक्ष
रविंद्र भेगडे यांनी अभिनंदन  केले.

"मन कि बात" या कार्यक्रमाला मावळ तालुक्यांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला असुन पुढेही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार असलेचे मन कि बात या कार्यक्रमाचे संयोजक अमोलजी भेगडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या