पुणे जिल्हाधिकार्यालयाने जिल्हा परिषद पंचायत समित्या गण निश्चित केले आराखडे निश्चित केले असून गुरुवार (दि.१०) रोजी राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सर्व आराखडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे परिषदेसाठी ८२ तर पंचायत समिती साठी एकूण १६४ जागा निश्चित केल्या आहेत.राज्य निवडणूक आयोग प्रथम प्रारूप आराखड्याची प्राथमिक सखोल तपासणी केली करणार असुन यात काही त्रुटी, दुरुस्ती आहे की नाही हे तपासणार असुन तद्नंतर आराखडे हे प्रसिद्ध करण्याची परवानगी देणार आहेत.
आराखडे प्रसिद्धीनंतर स्थानिकाकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत या हरकतींची निराकरण झाल्यानंतर गट व गण अंतिम केले जाणार असल्याचे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
0 टिप्पण्या