Ticker

6/recent/ticker-posts

पुणे - लोणावळा दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन ...


पुणे - लोणावळा दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी भाजपचे नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील यांची आज पुण्यात भेट घेऊन, मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवासी संघटनेकडून मागणी होत असलेल्या दोन बाबींचे निवेदन त्यांना देण्यात आले.
 या मागणी मधे सिंहगड एक्सप्रेस ला जाताना व येताना तळेगाव स्टेशन येथे थांबा द्यावा तसेच पुणे लोणावळा दरम्यानच्या लोकल फेऱ्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी करण्यात आली. 
      वरील दोन्ही बाबी पूर्ण कराव्यात अशा सूचना दानवे पाटील साहेब यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी मा राज्यमंत्री बाळा भेगडे ,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी प्रवासी संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या