Ticker

6/recent/ticker-posts

नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी....मालिकांचे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे- रविंद्र भेगडे तालुका अध्यक्ष भाजपा....

वडगाव दि.२४- महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना अटक झाली असून मालिकांचे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे त्यामुळे तातडीने नवाब मालिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज भारातीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने वडगांव येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

ज्या दाऊद इब्राहिम ने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले, वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी  मा.सभापती गुलाबकाका म्हाळसकर,मा.उपसभापती शांताराम  कदम,मा.उपसभापती दत्तात्रय शेवाळे,सरचिटणीस सुनील  चव्हाण, मच्छिंद्र केदारी,वडगांव नगरपंचायत नगरसेवक प्रवीण चव्हाण,युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर, विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु  शिंदे,सहकार आघाडी अध्यक्ष अमोल  केदारी,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे,वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,नामदेव  भसे,अमोल  धिडे,संस्कार चव्हाण आदी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या