कामशेत दि १२- ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे(कामशेत) हि मावळ तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे.वार्षिक उत्पन्न ही साधारण ४ कोटींच्यावर आहे.असे असताना ग्रामपंचायत यांच्या मनमानी कारभारामुळे कामशेत,खामशेत मधील नागरीकांना वेठीस धरले जात आहे.या विरोधात ग्रामपंचायत खडकाळे येथे मनमानी भोंगळ कारभार विरोधात कारवाई होण्यासाठी गटविकास अधिकारी श्री.एस.भागवत यांना निवेदन देण्यात आले... दि १२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नागरिक आले असताना ही कार्यालयात नागरिकांनची एकही अडचन सोडवण्यासाठी कर्मचारी उपस्थित नव्हते.दुपारी १ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्येत ग्रामपंचायत मध्ये कर भरण्यासाठी,दाखला घेण्यासाठी नागरीक कर्मचारी व ग्रामसेवक,प्रतिनिधी यांची वाट पाहत होते.
माहीती मिळाल्यानंतर समजले की सर्व स्टाप हा एका व्यक्तीच्या खाजगी कार्यक्रमासाठी गेला आहे.मा.उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणपत शिंदे यांनी ग्रामसेवक श्री काळे यांना फोन केला असता त्यांनी सदर विषयावर उडवाउडवीची उत्तरे दिली होती.
ग्रामपंचायत प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत असुन अंधाधुंद कारभार चालु आहे.कामशेत शहरांमध्ये वेळेवर पाणी नाही,कचर्या बाबतही हाच प्रश्न मग नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा हाच मोठा गंभीर विषय आहे.
या ग्रामपंचायत वर कारवाई करण्यासाठी आम्ही गटविकास अधिकारी यांना या बाबत निवेदन दिले आहे. मा.उपसरपंच संतोष कदम म्हणाले..
0 टिप्पण्या