Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी केला दलित वस्तीत मुक्काम ....

जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय परंतु पवन मावळ मधील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार किरण राक्षे यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचं समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीकडून कौतुक केले जात आहे.

दररोज संध्याकाळी एका दलित वस्तीत जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे वाटतं प्रत्येक कुटुंबात केल जातं. बाबासाहेबांच्या विचारांचा मार्गदर्शन करून छोटा कार्यक्रम घेतला जातो. कार्यक्रम संपल्यानंतर एका नागरिकाच्या घरी भोजन केले जातं. त्याचबरोबर त्या कुटुंबातल्या अडचणी समजून घेतल्या जातात. त्यानंतर दुसर्‍या नागरिकाच्या इथे मुक्काम केला जातो. सकाळी सर्व उरकल्यावर नवीन गावकर्याच्या इथं नाष्टा केला जातो. त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली जाते.
मोरवे येथील दलित वस्तीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच वाटप प्रत्येक कुटुंबात केल गेल. बाबासाहेबांच्या विचारांचे मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे सांगता केली. त्यानंतर त्याच वस्तीतील विजय शिंदे या नागरिकाच्या घरी रात्रीचे भोजन केले. त्यांच्या अडचणी जाणून घेत मावळ तालुका दिव्यांग आघाडी चे कार्यकर्ते राजू शिंदे यांच्या घरी रात्रीचा निवास केला व सकाळी उठुन नवीन कुटुंबात जाऊन सकाळचा नास्ता केला.

यासंदर्भात किरण राक्षे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले समाजातील असमानतेची दूरी दूर करून बंधुभाव जोपासत प्रत्येक घटकाच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

या उपक्रमाचं समाजाच्या प्रत्येक घटकातून कौतुक केले जात आहे जनसामान्यांना समजून घेणार एक आगळावेगळा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या