कामशेत दि.१३- खडकाळा(कामशेत) गणाच्या भारतीय जनता पार्टीच्या विध्यमान पंचायत समिती सदस्या तथा मा.सभापती सुवर्णताई संतोष कुंभार यांच्या विशेष प्रयत्नातून खामशेत,कुसगाव खु.,नायगाव,कान्हे,साई व नाणोली,कामशेत येथील विविध विकासकामांचे उद्घाटन तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, मा. सभापती गुलाबकाका म्हाळसकार, उपसभापती दत्ता शेवाळे,पु.जि. ओबीसी अध्यक्ष संतोष कुंभार, युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे ,महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला..!
खामशेत येथे भोईराज आळी येथील बंदिस्त गटार ५ लक्ष रुपये व सिमेंट रस्ता १ लक्ष रुपये. त्याचप्रमाणे कामशेत येथील अंतर्गत सिमेंट रस्ते ५ लक्ष रुपये व कुसगाव खु. येथील ३ लक्ष रुपायाच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कान्हे, साई, नांणोली येथील १० लक्ष रुपयांच्यावर कामांचा समावेश आहे.
या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना गेली २५ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मावळात सुरू असलेली विकासकामांची मालिका आजतागायत कशाप्रकारे सुरूच असून ती पुढे देखील देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली कशी सुरू आहे व राहील या संदर्भात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी सर्वसमावेशक विकासासाठी जनतेचा सेवक म्हणून कायमस्वरूपी बांधील असल्याचे मान्यवरांनी सांगितले..!
मोदी साहेबांच्या 'हर घर नल से जल' या उद्देशाप्रमाणे 'जल जीवन मिशन' योजने अंतर्गत 50 % खर्च हा केंद्र शासन व 50% खर्च हा राज्यशासन करत असून या योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात केंद्राचा निधी आपल्या मावळ तालुक्यात प्राप्त झाला असल्याचे या उद्घाटन प्रसंगी बोलतांना सांगितले..!
या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माऊली शिंदे, मा सभापती राजाराम शिंदे, मा.संचालक शिवाजी टाकवे, ज्येष्ठ नेते सुखन बाफना, पांडुरंग लालगुडे, भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे ,कामशेत शहराचे अध्यक्ष मोहन वाघमारे,कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सोनू गायकवाड, खडकाळा गण अध्यक्ष दिलीप वावरे ,दत्ता चोपडे, बजरंग वावरे मुलानी,नाथा पिंगळे, अतुल कार्ले,हरिभाऊ गायखे, ईश्वर पवार, विठ्ठल काळोखे, कुसगाव खु. ग्रामपंचायतचे सरपंच सुधीर लालगुडे,मा.सरपंच कामशेत जनाबाई पवार,रमेश बच्चे,सारिकाताई शिंदे, सरपंच संगीताताई गुरव, उपसरपंच रूपालीताई कुटे, उपसरपंच मनीषाताई लालगुडे राजश्री ठोसर यांच्यासह कामशेत,खामशेत व कुसगाव खु. नायगाव,कान्हे,साई व नाणोली येथील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या