Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता युवा माेर्चा लाेणावळा मंडलातर्फे महाविकास आघाडी सरकारने पारीत केलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयकाचा केला निषेध...

लोणावळा - भारतीय जनता युवा माेर्चा लाेणावळा मंडलातर्फे महाविकास आघाडी सरकारने पारीत केलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयक (काळे विधेयक) चा निषेध करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत.विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे..

युवा माेर्चाच्या वतीने आज मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांना शेकडाे पत्र पाठवून हे विधेयक त्वरीत मागे घेण्यात यावे ही मागणी केली.
या प्रसंगी भारतीय जनता युवा माेर्चा शहराध्यक्ष शुभम मानकामे, युवा वाँरियर्स पश्चिम महाराष्ट्र सहसंयाेजक प्रथमेश पाळेकर, जिल्हा उपाध्यक्ष युवा वाँरियर्स आेमकार पाटील, जिल्हा सचिव युवा वाँरियर्स आकाश राठाेड, युवा माेर्चा शहर उपाध्यक्ष श्रवण चिकणे, सरचिटणीस सुशिल जगताप, युवा वाँरियर्सचे आयुष कांक्रिया, युवती आघीडीचे नेहा पालकर, कावेरी काळे, प्रणाली बना, विद्यार्थी आघाडी संयाेजक सनी कडू, विघ्नेश साेनावणे, संकेत निकुडे, चैतन्य दळवी, यश वाळंज, शैलेश ठाकर, सचिन उंबरदंडे, क्रिष्णा शर्मा, आेमकार वाळंज, यश पिसे व इतर पदाधिकारी उपस्थित हाेते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या