Ticker

6/recent/ticker-posts

मा. राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत मधे विविध कार्यक्रम... कामशेत शहर भाजपा वतीने भव्य रक्तदान शिबिर तर सोशल मीडिया मावळ वतीने विद्यार्थ्यांना फळे वाटप ...


मावळ दि.३०-भारतीय जनता पार्टी कामशेत शहर वतीने मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून (दि.३० रोजी) भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये सकाळी १० ते दु.२ वाजेपर्यंत ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

       सोशल मीडिया च्या वतीने कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम कामशेत शाळेत विद्यार्थ्यांना फळे देऊन मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सोशल मीडिया च्या वतीने अध्यक्ष सागर शिंदे, विकास घारे, अनिकेत सस्ते ,संदीप सावळे, अनिकेत काटकर यांच्या वतीने मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती  बाळा भेगडे यांनी महर्शी कर्वे आश्रम शाळेला मुलींच्या कन्यादान योजनेला 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्यार्थी आघाडी मावळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी केले.

      कामशेत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा सत्कार कामशेत शहराध्यक्ष मोहन वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे , संजय बेनगुडे,शंकर पिंगळे, संजय लोणकर प्रवीण खोल्लम, रमेश बच्चे, बबलू सुर्वे,नितिन गायखे,राहूल गदिया,शंकर काजळे,कुंदन परमार,रत्न जैन,संदिप साठे,सागर साळवे यांच्या हस्ते करण्यात आला .

        यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती ज्योतीताई शिंदे,जेष्ठ नेते माऊली शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे,मा.अध्यक्ष प्रशांत ढोरे, बाळासाहेब गोरे, युवा मोर्चा मावळ अध्यक्ष संदीप काकडे ,मावळ महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे, संघटक धनंजय वाडेकर, मा.सभापती गणेश गायकवाड, सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिंद्र केदारी, हरिभाऊ दळवी, विश्वनाथ नानेकर, मा.सभापती सुवर्णाताई कुंभार, कार्याध्यक्ष अर्जुन पठारे, संघटनमंत्री गणेश  ठाकर, पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे, सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी, धनगर परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे, विद्यार्थी आघाडी अं.मा.अध्यक्ष विठ्ठल तु्र्डे, विद्यार्थी आघाडी प.मा. अध्यक्ष प्रशांत लगड, नीलेश कडू,मा.सरपंच वसंत काळे,मा.उपसरपंच गणपत शिंदे, काशिनाथ येवले,मिनाताई मावकर, जनाबाई पवार,सारिका शिंदे,स्वाती सुर्वे,मावळ आर.पी.आय.नेते संतोष कदम, रुपेश (सोनु)  गायकवाड,चंद्रकांत दौडे,अतुल कार्ले, अर्जुन शिंदे, विपिन बाफना, बाळासाहेब गायखे, गिरीश रावळ, पप्पूशेठ गदिया,अंकुश काटकर,योगेश पवार, मोरेश्वर फुगे, जनार्धन जाधव,युवराज शिंदे, रामदास तुपे,प्रदीप हुलावळे दत्ताभाऊ  कोंडभर, विनायक कोंडभर ,अरुण भानुसघरे, संतोष ढाकोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
       
       या कार्यक्रमांमध्ये विशेष सहकार्य डॉक्टर सचिन नागोत्रा तसेच जनकल्याण रक्त केंद्र ,पुणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या