Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीला धक्का ....पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूक मध्ये भाजपाचे तुकाराम भोईरकर यांचा अर्ज ग्राह्य हायकोर्टाचा निर्णय...पुन्हा निवडणुकीचे बिगुल वाजणार....


पुणे : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूक मध्ये भाजपचे उमेदवार तुकाराम भोईरकर यांचा अर्ज मुंबई हायकोर्टाने ग्राह्य धरल्याने पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. ही निवडणूक भाजपची प्रतिष्ठेची असल्याने त्यांनी छाननी मध्ये बाद झालेल्या अर्जां विरूद्ध मुंबई हायकोर्टात अपील दाखल केले होते. अपिलावर आज (दि.२१रोजी) निर्णय झाल्याने मुंबई हायकोर्ट ने निर्णय देत भाजपाचे तुकाराम भोईरकर यांचा अर्ज ग्राह्य केला. 

          काही दिवसापूर्वी भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनाचे उमेदवार माऊली दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली होती. या निवडणूक मध्ये भाजपकडून शैलजा दळवी, शांताराम काजळे, तुकाराम भोईरकर यांनी उमेदवाराचे अर्ज दाखल केले होते. पण हे तीनही अर्ज छाननीमध्ये बाद झाले होते. परंतु भाजपने याविरुद्ध संयमाची भूमिका घेत न्यायालयीन मार्गाने लढा देत न्याय मिळवला यामध्ये मा राज्यमंत्री बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे ,जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मा.सभापती ज्ञानेश्वर दळवी,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी यांनी विशेष प्रयत्न केले.
_________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या