Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत आर.पी.आय.(A) शहर अध्यक्षपदी नितीन ओव्हाळ तर युवक अध्यक्षपदी रुपेश गायकवाड यांची नियुक्ती....

कामशेत - रिपबलिकन पार्टी इंडिया (आठवले) कामशेत शहर अध्यक्ष पदी नितीन ओव्हाळ युवक अध्यक्ष रुपेश शंकर गायकवाड यांची निवड जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव ,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख समिर जाधव, युवक अध्यक्ष संतोष कदम, उपनगराध्यक्ष लोणावळा दिलीप दामोदर, अनिल भांगरे ,मावळ तालुका सरचिटणीस संदिप शिंदे, सरपंच जांभूळ नागेश ओव्हाळ, जिल्हा संघटक अतुल सोनवणे, सुनिल पवार , मावळ तालुका उपाध्यक्ष अशोक केदारी, संजय वाघमारे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.     

           रुपेश शंकर गायकवाड यांच्या पत्नी मोनिका रुपेश गायकवाड ह्या कामशेत ग्रामपंचायत सदस्य असून त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला असून भविष्यकाळात संघटना मजबूत करण्याचा संकल्प नवनियुक्त अध्यक्ष नितीन ओव्हाळ व रुपेश शं.गायकवाड यांनी केला आहे.
_________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या