मावळ दि .१६-बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांनी बैलगाडा शर्यत झाली परंतु यामध्ये सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी कोर्टात बाजू मांडण्यासाठी मोलाची भूमिका मांडणारे ऍड.मुकुल रोहदगी यांची नियुक्ती तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात बाळा भेगडे राज्यमंत्री असताना त्यावेळी राज्यातील तमाम बैलगाडा मालक व बैलगाडा प्रेमींची प्रामुख्याने मागणी होती महाराष्ट्र राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका ३६२६/२०१८ तसेच ट्रान्सफर पिटिशन क्र.४३१/२०१८ संदर्भात युक्तिवाद करण्यासाठी ऍड.मुकुल रोहदगी यांची नेमणूक करावी, असा आग्रह बाळा भेगडे यांच्याकडे बैलगाडा संघटना मालकांनी केला होता.
त्यावेळेस राज्यमंत्री बाळा भेगडे हे सर्व बैलगाडा शिष्ट मंडळ समवेत घेऊन दिनांक ०७.०९.२०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गाडामालकांच्या मागणीप्रमाणे अवघ्या काही मिनटात ऑर्डर करून घेतली. आज दि.१६ रोजी ऍड.मुकुल रोहदगी यांनी मा.सर्वोच्च न्यायालयात बळीराजाची खंबीरपणे बाजू मांडून विजय मिळवून दिला, त्याबद्दल जिल्ह्यातील बैलगाडा संघटनांनी त्यांच्या निवास्थानी भेट घेत एकमेकांना पेढा भरवून आनंद साजरा केला.
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा असून त्याचप्रमाणे राज्यातील सर्व खासदार,आमदार,लोकप्रतिनिधी, बैलगाडा मालक संघटना,गाडामालक यांचे अथक प्रयत्नांचा विजय आहे.
-------------------
0 टिप्पण्या