वडगाव मावळ: भारतीय जनता पार्टीची सहकार आघाडी मावळ अध्यक्ष पदी अमोल केदारी यांची निवड आज वडगाव मावळ येथे भाजप पक्ष कार्यालयात करण्यात आली
अमोल केदारी हे सहकार महर्षी भाजपचे नेते बाळासाहेब नेवाळे यांचे विश्वासु सहकारी आणि सहकार क्षेत्रात अत्यंत अभ्यासपूर्वक काम करणारे अशी त्यांची ओळख मावळ मध्ये आहे.त्यांना जबाबदारी दिल्याने पुढील येणाऱ्या सहकार क्षेत्रातील निवडणूका प्रामुख्याने मध्यवर्ती सहकारी बँक असेल, दूध संघ असेल किंवा होऊ घातलेले सोसायटीच्या निवडणुका असेल ह्या मध्ये त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याचा मानस हा आज त्यांनी पक्ष कार्यालयात व्यक्त केला पुढील 1,2 आठवड्यात सहकार आघाडीची कार्यकरणी जाहीर करण्यात येईल हे देखील ह्यावेळी सांगण्यात आले
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे,विकास शेलार,सरचिटणीस मच्छिंद्र केदारी,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले,कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी,जेष्ठ नेते सखाराम देशमुख,गणेश देशमुख,गणेश आहेर,विशाल रसाळ,सुनिल कारके,व सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या