Ticker

6/recent/ticker-posts

मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरुवार (दि.१८) रोजी सार्वजनिक कार्यक्रमातुन ३० ते ४० नागरीकांना विषबाधाझाल्याची धक्कादाय घटना....

मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरुवार (दि.१८) रोजी सार्वजनिक कार्यक्रमातुन ३० ते ४० नागरीकांना विषबाधाझाल्याचा धक्कादाय प्रकार घडला.

मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात हा प्रकार घडला असुन बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामीण रुग्णालय पवना नगर येथे भेट देऊन बाधा झालेल्या नागरिकांशी संवाद साधून धीर दिला.
तसेच काही रुग्णांना कान्हे व यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे पाठवण्यात आले असून त्याठिकाणच्या संबंधित डॉक्टरांशी संवाद साधून तात्काळ उपचार देण्याचे सूचना यावेळी केल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,मा.सभापती ज्ञानेश्वर दळवी,मा.गुलाबराव म्हाळस्कर,पंचायत समिती सदस्य शांताराम बाप्पू कदम,मा.निकिताई घोटकुले,जिल्हापरिषद सदस्य अलकाताई धानीवले,मा.बाळासाहेब घोटकुले,युवाध्यक्ष संदीप काकडे,सरचिटणीस सुनील चव्हाण,शहराध्यक्ष रवींद्र माने,रमेश आडकर,मा.गणेश ठाकर मा.विनायक भेगडे,गटविकास अधिकारी सुधीर भागवत,डॉ.पाटील सर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या