वडगाव मावळ - दैनिक सकाळचे पत्रकार रामदासजी वाडेकर यांनी आपल्या व्हाट्सअप्प स्टेट्स वर शनिवार दि. २७/११/२०२१ रोजी सकाळी ७.३० ला पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर साते येथे माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या पायी आळंदीकडे जाणा-या दिंडीला झालेल्या अपघातातील जखमींना ए.बी पाॅझिटिव्ह रक्ताची गरज असल्याची पोस्ट शेअर केली.
त्याला लागलीच प्रतिसाद म्हणुन सौ. सोनाली पांडुरंग गांधीले (विधाटे) राहणार साळुंब्रे मावळ यांनी AB POSITIVE रक्तदान करून कर्तव्य पार पाडले.
'जसे म्हणतात तसे रक्तदान करा' जीवन वाचवा, अगदी तसेच कार्य पार पाडले. ताई सलाम आपल्या कर्तृत्वला.
या वेळी डॉक्टर विकेश मुथा यांनी या भगीनीचे आभार मानले.
0 टिप्पण्या