वडगाव मावळ : आळंदीकडे पायी जाणार्या दिंडीमध्ये भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो घुसल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात २६ वारकरी जखमी झाले असून २ वारकरी महिला मृत्युमखी पडल्या आहेत.मृतांमध्ये सौ.विमल सुरेश चोरगे (वय ५०) रा.बिड खुर्द,खालापुर, सौ.जयश्री आत्माराम पवार (वय ५४) रा.भुतवली,खालापुर, सौ सविता वाळकु येरम (वय ५६) या उंबरे सौ संगीता वसंत शिंदे (वय २५ )रा.कर्जत
महिला वारकऱ्यांचा समावेश आहे.
कार्तिकी एकादशी वारीसाठी माउली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, उंबरे (ता. खालापूर) येथील सुमारे २०० वारकरी पायी आळंदीच्या दिशेने चालले होते.
नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात काल रात्री मुक्काम होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखीने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दिंडी साते फाट्याजवळ अतिथी हॉटेलसमोर आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेला पिकअप टेम्पो या पायी चालणाऱ्या वारीमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला.
जखमींवर कामशेतमधे महावीर हॉस्पिटल व वडगाव मावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या