Ticker

6/recent/ticker-posts

पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीरउच्च न्यायालयाने दिले आदेश.....


मावळ -मुंबई उच्च न्यायालयाने पुणे, कोल्हापूर सिंधुदुर्ग, मुंबई या जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात याचिकांवर निर्णय देत न्यायालयाने निवडणूकीस परवानगी दिली आहे. यासंदर्भात दाखल याचिका फेटाळून लावत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक याचिका दाखल कराव्यात असे निर्देश दिले आहे.

     पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाने शुक्रवारी जाहीर केला असून रविवारी दिनांक २९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी 2 जानेवारी २०२२ रोजी मतदान घ्यावे असे आदेश प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहे. यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे .  
          निवडणुकीसाठी विविध टप्पे जाहीर करण्यात आले आहेत दि.२९ रोजी स.३ ते दु.२ या वेळेत नाम निदर्शन पत्र दाखल करण्यास सुरुवात होईल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ डिसेंबर आहे.

निवडणूक कार्यक्रम :

उमेदवारी अर्ज दाखल करणे : २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर

उमेदवारी अर्जाची छाननी :७ डिसेंबर

अर्ज मागे घेणे : ८ ते २२ डिसेंबर

मतदान : २ जानेवारी

मतमोजणी : ४ जानेवारी

उमेदवार पुढीलप्रमाणे :

मतदार संघ, उमेदवार संख्या

अ. तालुका प्रतिनिधी, विकास सोसायटी -१३

ब. कृषी, पणन, प्रक्रिया संस्था प्रतिनिधी-१

क. नागरी सेवा व पतसंस्था-१

ड. पाणीपुरवठा, ग्राहक व इतर संस्था-१

अनु. जाती, जमाती प्रतिनिधी-१

इतर मागासवर्ग प्रतिनिधी-१

वि.जा., भ.ज. वि.मा. प्रवर्ग प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या