वडगाव मावळ दि.२३ - मावळ तालुक्यातील निगडे, माळेगाव व तळेगाव दा.येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मा. राज्यमंत्री बाळा भेगडे ,जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे जि.प.सदस्य नितिन मराठे यांच्या मार्गदर्शनाखालीआज दि २३ रोजी निगडे विविध कार्यकारी विकास सोसायटी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टिच्या वतीने गुजीराम शिंदे ,(कल्हाट ) सोनू आगिवले (कल्हाट) दादाभाऊ कोयते(कल्हाट) चंद्रकांत कलावडे (निगडे) दशरथ शेलार( निगडे) बंडूशेठ थरकुडे यांनी अर्ज दाखल केला असून यावेळी जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे,मा.उपसभापती शांताराम कदम, सरचिटणीस सुनील चव्हाण,गणेश कल्हाटकर, सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे,सचिन पांगारे ,गणेश भांगरे, रामदास चव्हाण,नथुभाऊ थरकुडे, तान्हाजी येवले ,बबन अगिवले ,दादाभाऊ भांगरे, चंद्रकांत कर्पे आदी सर्व ज्येष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
_____________________________
0 टिप्पण्या