कामशेत भाजपाचे मतदार नोंदणी अभियान...
कामशेत दि. २६- भारतीय जनता पार्टी कामशेत शहर वतीने कामशेत शहरांमध्ये नविन मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत असून निवडणूक आयोगाने पुनरनिरीक्षण मतदार नोंदणी कार्यक्रम चालू केला असून प्रशासनाला सहकार्य म्हणून कामशेत भाजपा वतीने शहरातील प्रत्येक वार्ड मधे नोंदणी केंद्र तयार करण्यात आले आहे. दि.२५ ते २६ इंद्रायणी कॉलनी ,दि.२७ रोजी प्राथमिक शाळा, कामशेत,दि.२८ रोजी विठ्ठल मंदिर कामशेत गावठाण येथे होणार आहे. तसेच भाजपा बूथ अध्यक्ष हे आपल्या बुथ मधे मतदार नोंदणी कार्यक्रम राबवत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने नोंदणी अभियानात नवीन मतदार नोंदणी, स्थलांतरित , नाव दुरुस्ती होत असुन ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांचे मतदार नोंदणी करत आहेत. नवीन मतदार नोंदणी साठी छायाचित्र ,आधार कार्ड लाईट/ बिल रेशन ,कार्ड बँक पॅनकार्ड अशी कागदपत्रे आवश्यक असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.
या मतदार नोंदणी अभियानात भाजपा विद्यार्थ्यी आघाडी मावळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे.कामशेत उपाध्यक्ष रमेश बच्चे,मा. उपसरपंच काशिनाथ येवले योजना दूध समीर भोसले, लालगुडेमामा , अविनाश जाधव,आदी कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला आहे.
नोंदणी साठी संपर्क - प्रविन शिंदे,अभिमन्यू शिंदे,रमेश बच्चे,संजय लोंनकर,समीर भोसले.
0 टिप्पण्या