पवार साहेब हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी जे मावळ तालुक्यातील भाजपाच्या परिस्थिती विषयी जे भाष्य केले आहे त्यावर मी एवढंच सांगेल की ती परिस्थिती काय आहे हे आगामी निवडनूकांमधून आपल्याला दिसेल.
पवार साहेबांनी पवना गोळीबार प्रकरण आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा जोडलेला संबंध दिशाभूल करणारा आहे.कारण त्यावेळची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती ती तालुक्यातील जनतेला माहीत आहे.
आणि पवना गोळीबार प्रकरण झाल्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत आणि अगदी त्यांच्या नातवाला देखील याच मावळ च्या मतदारांनी पराभूत केले आहे,याचा बहुदा त्यांना विसर पडला असावा..!
त्यामुळे मला एवढंच सांगायचे आहे की, ज्या मावळ तालुका मतदारसंघाच प्रतिनिधित्व स्व.रामभाऊ म्हाळगी यांनी केलं आहे. आणि सातत्यानं इथला मतदार हा जनसंघ ,भाजप आणि हिंदुत्वाच्या विचारांवर निष्ठा ठेवणारा राहिला आहे.
त्यांनी पवारांचा विचार कधीच स्वीकारलेला नाही आणि स्वीकारणार नाही हे आगामी काळात दिसून येईल..
मावळ गोळीबार घटनेवेळी पोलिस जबाबदार आहेत. हे म्हणने म्हणजे आपल्या पक्षाला व पुतण्याला गोळीबारातुन निर्दोश मुक्तता करण्याचा शरद पवारांनी केविलवाणा प्रयत्न केला.तर हे प्रकरण आजुन न्याय प्रविष्ट आहे. तसेच ज्यावेळी सत्ता असते तेव्हा पोलिस खाते पक्षाच्या ताब्यात असते हे शरद पवार साहेब विसरले की काय ? असा सवाल भेगडे यांनी उपस्थित केला.
0 टिप्पण्या