आढले बु दि.१७-"आपलं मावळ आपलं कमळ "अंतर्गत आढले बुद्रुक गावामध्ये भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन समारंभाला उपस्थित प्रमुख्याने तालुक्याचे लोकसभा प्रभारी प्रशांत ढोरे ,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, युवा नेते रवींद्र मुर्हे , युवा नेते रामभाऊ गोपाळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
तसेच उपस्थितीमध्ये आढले गावच्या या भाजपच्या अध्यक्षपदी तानाजी घोटकुले यांची व भाजप युवक अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मधुकर सावंत तसेच भाजपा विद्यार्थी आघाडी वैभव भोईर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमास आढले गावातील युवक व जेष्ठ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाचा आत्मा आहे असे यावेळी बोलताना बाळा घोटकुले यांनी सांगितले
0 टिप्पण्या