उत्तर प्रदेश मधील लखीमपुरची घटना ही दुर्दैवीच, त्यासंदर्भातील दोषींना फासावर लटकवल गेलं पाहिजेत परंतु महाराष्ट्रामध्ये शेतकरी रोज नवनवीन संकटाना सामोरे जात असताना महाभकास आघाडी सरकारने जो उद्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे त्याचा आम्ही विरोध करतो..
या ढोंगी सरकारने मावळमधील पवना जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला यात शेतकऱ्यांना गोळ्या झाडून मारण्यात आले त्यावेळेस महाराष्ट्र बंद का केला नाही. महाराष्ट्रात सतत बलात्काराच्या घटना घडत आहेत हे थांबवण्याचे सोडून आरोपीना पाठीशी घालत आहेत. राष्ट्रवादीच्या युवा प्रदेश अध्यक्षवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
साकीनाका येथे एका निष्पाप महिलेवर बलात्कार झाला त्यावेळेस मावळमध्ये का बंद पाळण्यात आला नाही . महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईपासून पळवाट शोधत आहे. हे सरकार जनतेची दिशाभूल करत असून उद्याच्या मावळ बंदला प्रतिसाद न देता मावळ तालुक्यातील सर्व व्यावसायिक,व्यापारी व शेतकरी ,हॉटेल व्यावसायिक उद्योजक विविध संस्थाचे प्रमुख यांनी आपले दैनंदिन व्यवहार चालु ठेवावेत असे भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी सांगितले आहे
0 टिप्पण्या