Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजनेतूनमिळणार आपल्या हक्काचे घर...प्रतिक्षा संपली... प्रत्यक्ष कामाला सुरुवात..


       मावळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य जनतेची प्रतीक्षा संपली असून त्यांना आपल्या स्वतःच्या हक्काचे घर येत्या काळात मिळणार आहे. या योजनेच्या घटक क्रमांक ४ मधे वैयक्तिक स्वरूपातील पक्की घरे स्वमालकीच्या जागेवर बांधकाम परवानगी तसेच नकाशा आराखडा तयार होऊन प्रारंभ प्रमाणपत्र तथा बांधकाम कार्यादेश (दि.२३ ) भोयरे गावात वाटप करण्यात आले असून या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. 
     
         योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातून असे १६७०० जणांनी लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते .या अर्जांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी छाननी होऊन पहील्या टप्यात मावळ तालुक्यातील पहिल्या टप्प्यामधील भोईरे, साते, ठाकूरसाई ,कढदे ,डोने, ब्राम्हणोली, करंजगाव, ओवळे, काले, धनगाव ,दिवड, महागाव, येलघोल, पुसाने ,आढले खुर्द,येळसे, शिवणे, साळुंब्रे  आदी गावांमध्ये नियम अटीचे पालन करून १३९८ घरांना पक्के बांधकाम करण्यास मंजुरी आदेश देण्यात आले .
       
         पहिल्या टप्प्यात प्लींथ लेवल पर्यंत बांधकाम पूर्ण झाल्यावर १००००० रू, दुसऱ्या टप्प्यात छताचे बांधकाम पूर्ण झाल्यावर १०००००, तिसऱ्या टप्प्यात घराचे बांधकाम पूर्ण होऊन सर्वात महत्वाचा दाखला मिळाल्यानंतर ५०००० हजार असे लाभार्थ्यास एकुण २५००००/रक्कम रूपये  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असे मिळणार आहेत. 

          गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये  पंतप्रधान आवास योजने वर टिकाही झाली होती सदरची योजना खोटी आहे असेही विरोधका कडून त्या वेळी बोलले जात होते.त्यावेळेस सत्तेतील मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी या टीकेला उत्तर न देता संयमाची भूमिका घेत आपले काम चालूच ठेवले होते .
       प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ज्या नागरिकांनी अर्ज दाखल केले होते त्यांच्या घराच्या बांधकामास मंजुरी येऊन प्रत्यक्षात काम सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या