पवनानगर - पै.बाळासाहेब लक्ष्मण घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर चौक येथे रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ४:३० ते ६:३० या वेळेत महाराष्ट्र भूषण रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे . या कीर्तन कार्यक्रमामधे मावळ तालुक्यातून सर्व वारकरी संप्रदायातील प्रमुख मान्यवर मंडळी तसेच गायक वादक मोठ्या संख्येने सहभाग सहभागी होणार आहेत.
पै.बाळासाहेब घोटकुले यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु समाजामध्ये देव ,देश, धर्माविषयी जनजागृती व्हावी यामुळे या वर्षी त्यांनी ज्ञानदानाचा कार्यक्रम ठेवला आहे.
आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी असे बाळासाहेब घोटकुले यांनी आवाहन केले आहे.
--------------------------
0 टिप्पण्या