Ticker

6/recent/ticker-posts

पीएमआरडीए - PMRDA सदस्यपदाच्या निवडणूकीसाठी मावळ मधुन कुलदीप बोडके भाजपचे उमेदवार

मावळ : पीएमआरडीए साठी भाजपचे चार उमेदवार जाहीर... पुणे महानगर नियोजन समितीच्या (पीएमआरडीए - PMRDA)  सदस्यपदाच्या निवडणूकीसाठी पुणे ग्रामीण भाजपने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष  गणेश भेगडे व सरचिटणीस अविनाश बवरे यांनी दिली. 
पीएमआरडीएच्या सदस्य पदासाठी येत्या 10 नोव्हेंबरला,  निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे ग्रामीण जिल्हा भाजपने पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार लहान नागरी निर्वाचन क्षेत्र मतदार संघात  अरुन भेगडे, (तळेगाव दाभाडे) यांना तर ग्रामीण निर्वाचन क्षेत्र मतदार संघात  स्वप्निल दत्तात्रय ऊंद्रे, (हवेली)  मिनिनाथ मारुती कानगुडे, (मुळशी) व श्री कुलदीप गोविंद बोडके (मावळ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या