मावळ दि.९- अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका यांजकडून शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर यांना वारकरी भवन व्हावे अशी मागणी केली त्या बद्दल अनुमोदन दिले.
मावळ तालुक्याला वारकरी संप्रदायाची परपंरा आहे .प्रत्येक गावात हरीनाम सप्ताह होतात तालुक्यातील अनेक दिंड्या पायी आळंदी पंढरपूरला जात असतात .
यासाठी येथे वारकरी भवन व्हावे अशी अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ आणि मावळ तालुक्यातील वारक-यांची मागणी अनेक वर्षे पासुन आहे.
शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर यांनी कृषी राज्य मंत्री ना. दादा भुसे साहेब यांचे कडे मागणी केली आहे म्हणुन आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका यांचे कडुन अनुमोदन दिले. वारकरी भुवन होण्यासाठी मी पाठपुरावा करील असे आश्वासन दिले राजुभाऊ खांडभोर यांनी या वेळी दिले.
उपस्थित मध्ये जिल्हा अध्यक्ष हभप सुखदेव महाराज ठाकर, तालुका अध्यक्ष दत्ता महाराज शिंदे, उपाध्यक्ष गोपीचंद महाराज कचरे, कार्याध्यक्ष हभप संजय महाराज कालेकर, प्रमुख मार्गदर्शक दिलीप महाराज खेंगरे, सचिव गणेश महाराज जांभळे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य शंकर हेमाडे उपस्थित होते.
0 टिप्पण्या