Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी उपाशी, पार्टीवाले तुपाशी.... मावळात जमिनी हडप करणाऱ्या भस्मासूराचा उदय..


मावळ दि.१० - मावळ तालुक्यांमध्ये नवीन भस्मासुराचा उदय झाला असुन आज या भस्मासुराला शासकीय अधिकारी पाठीशी घालीत असेल तर या भस्मासुराला आळा कोण घालणार अशी याचना शेतकरी अतुल चोपडे यांनी केली आहे.

            शासन दरबारी मा. राज्यपाल, मा.मुख्यमंत्री, मा.महसूलमंत्री ,सचिव, आमदार खासदार सर्वांना पत्रव्यवहार केला यातून फक्त नशिबी आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही आज जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना म्हटले जाते तो शेतकरी आज याच सरकारी दरबारी दिन-दुबळा होत आहे. असे झाले तर एक दिवस या महाराष्ट्रातून शेतकरीच गायब होईल त्यांची जागा धनिक, दलाल घेतील विविध ठिकाणी शेतकऱ्यांना वाचवण्या साठी विविध पक्षाचे नेते मोठी विधाने करतात परंतु शेतकऱ्या वरती अन्याय झाला तर त्यांच्या मदतीसाठी कोणीही वाली उभा राहत नाही. 

         अशीच घटना  कोंडीवडे(ना.मा) गावातील रहिवासी अतुल तुकाराम चोपडे यांच्याबाबत झालेली दिसून येते त्यांची वडिलोपार्जित मिळकत नायगाव,ता.मावळ जि.पुणे येथील वडीलोपार्जोत गट नं ३७० क्षेत्र २२.३३ आर, (३७१ क्षेत्र ६७ आर, फेरफार क्र.१२८३ नुसार) व ३७२ क्षेत्र ९३.३३ आर व २३२ क्षेत्र ४.३३ आर व इतर मिळकती ह्या जमिनीपूर्वी  कै.कोंडीबा चोपडे यांच्या नावे दाखल होती. त्यांच्या निधनानंतर त्याचे कायदेशीर वारस कै.नामदेव कोंडीबा चोपडे व इतर यांचे नाव फेरफार क्र.८५३ अन्वये दाखल आहे. वरील संपूर्ण मिळकत ही चोपडे यांच्या  तांबे- वहिवाट असल्याबाबत तलाठी व मंडळ अधिकारी  सो (जा.क्र.मंअख/कावि/६०९ /२०१९)  यांनी  स्थळ पाहणी व पिकांची नोंद करून तशी झाडांची व पिकांची नोंद करण्यासाठी मा.तहसीलदार साहेबांनी  क्आर.हनो /कवि/ १४३० /२०२० आदेश दिले होते. तदन्तर  गाव कामगार तलाठी यांनी पिकांची नोंद  ज्वारी झाडांची नोंद आंबा करण्यात आली आहे. वडिलोपार्जीत हक्क मिळवा म्हणून येथील  चोपडे शेतकर्यांनी अनेक वेळा महसूल अधिकारी यांचेकडे अपील,अर्ज, निवेदने देण्यात आले. परंतु या संबंधीत महसूल विभागाने अल्पभूधारक चोपडे यांच्या या मागणी कडे दुर्लक्षच करणे पसंत केले आहे. 

        दरम्यान, याच गट नंबर ३७०, ३७१, ३७२  व  २३२ क्षेत्र ४.३३ आर  मध्ये  काही धनदांडग्या लोकांनी तत्कालीन महसुली अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून काही  ७/१२ सदरी अनेक बोगस तसेच सह्या नसताना बेकायदेशीर रित्या खरेदी केल्या आहे. तसेच  खरेदी घेणारे शेतकरी नाही, खरेदी घेणारे याच्या कडे शेकडो एकर पेक्षा जास्त जमिन बेकायदेशीर पणे खरेदी केल्या आहे., महाराष्ट्र  जमिन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम १९६१  मधील  कलम ४० अन्वये पाञ आहे, खरेदी घेणार यांनी पुर्वी व नंतर ही जे जे  दाडेकर मशीन वक्रस असल्याने त्याकामी कलम ६३  अन्वये कलेक्टर यांची परवानगी घेतली नाही. खरेदी घेणारे यानी तुकडे बंदी तुकडेजोड कायद्याचा भंग झालेला आहे. आशा अनेक बोगस नोंदी असताना देखील न्याय मिळण्यासाठी  शेतकर्याचे  प्रयत्न  अपुरे पडत आहे. आज रोजी  वंचित शेतकर्याची  ७/१२  नोंद नाही, परंतु  फेरफार  क्र. ८५३  अन्वये  नोंद  ताबा- वहिवाट आहे. त्यामुळे ७/१२ वर नोंद  नसणारा चोपडे यांच्या  ताबे- वहिवातीस असलेला जमीनवरचा ७/१२ उतारा गेला चोरीला गेल्या असल्याचा प्रकार मावळ तालुक्यात घडला. या संबधित हक्क मिळवण्यासाठी व बेकायदेशीर, शर्तभंग प्रकरणी  तसेच  शेतकर्याच्या कुतुबाच्या जीविताला धोका असल्याबाबत  मंत्रालय स्तरापर्यंत तसेच  महाराष्ट्रतातील मंत्री महोदयांना व महसूल अधिकारी यांना येथील शेतकर्यांनी निवेदने  पाठवून आवाज उठविला पण वरिष्ठ अधिकार्यांनी  हे प्रकरण मा. जिल्हाधिकारी  साहेब  पुणे  यांचेकडे  आजोबांच्या व वडिलांच्या सह्या नसताना बेकायदेशीर रित्या खरेदी केल्या आहे. त्या चौकशीसाठी संबधी २०२०- २०२१  मध्ये पाठवले  त्यासंदर्भात  चौकशीसाठी संबधी स्पष्ट अहवाल मागवला होता. त्या अनुषगाने मंडल अधिकारी याच्या कार्यालयात सखोल चौकशी करून  वादी व प्रतिवादी यांना नोटीसा देऊन म्हणने मांडण्याची संधी देऊन  तसेच  शेतकर्याने मह्सूल प्र्शासनला सर्व योग्य ते पूरावे येथील शेतकर्याने सादर केले आहेत. त्या अंनुषगाने वस्तुष्टी असताना  बेकायदेशीर  व शर्तभंग झाल्याबाबत मंडल अधिकारी साहेब यांनी  वरिष्ठ कार्यालयात अहवाल क्र. मंअख/कावि/६८२ /२०२०, क्र.मंअख/कावि/२६८ /२०२०, क्र.मंअख/कावि/२९१/२०२१, क्र.जा.क्र.मंअख/कावि/३३१/२०२१ व  जा.क्र.मंअख/कावि/२३३/२०२१ तसेच जा.क्र.मंअख/कावि/२६५/२०२१ असे अहवाल पाठवला असताना  तसेच क्र.तमक /एस आर /२८/२०२० हि केस मा.तहसीलदार कार्यालयातून वादी व प्रतिवादी यांना नोटीसा देऊन म्हणने मांडण्याची संधी देऊन केस निकालावर आहे .संबधीत  प्रशासन अथवा महसूल अधिकारी तथा तहसीलदार साहेब या गैरप्रकाराबाबत प्रचलित शासन नियमानुसार करवाई करणार का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.  

         त्यामुळे एकीकडे  बेकायदेशीररित्या  व शर्तभंग नोंदी  दुसरीकडे अधिग्रहीत वडीलोपार्जोत जमिनीचा  हक्क हा चोपडे शेतकरी यांना  मिळेल का नाही ? प्रशासन  नक्की  कधी सोडवेल ?  या कडे  सर्वांचे  लक्ष् लागले अन्यथा फेरफार क्र.८५३ अन्वये  नावाची नोंद असताना ७/१२ उता-यावर  नाव नाही प्रत्यक्षात मात्र  ताबे- वहिवातीस असलेला जमीनवरचा ७/१२ उतारा चोरीला गेल्याची  तक्रार करण्याची वेळ चोपडे येथील खातेदारांवर आली आहे. 

              या भस्मासुराच्या तावडीतून कसे सुटावे हाच मोठा प्रश्न शेतकरी अतुल तुकाराम चोपडे यांना पडला आहे. श्री गणेशाच्या आगमनाने या भस्मासुराचा अंत व्हावा असेच याचना कुटुंबियांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या