मावळ दि.९ - ६ जुलै डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिना पासून ते भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पर्यंत महाराष्ट्र प्रदेश कमिटीने समर्थ बूथ अभियान राबवले आहे.
७२ दिवसाच्या अभियानात मुख्य ७ टप्पे ठरवण्यात आले मावळ तालुक्यांमध्ये संपूर्ण ३७० बूथ या समर्थ बूथ अभियानाअंतर्गत पुनर्गठन केले जाणार आहेत.
मा. राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे व तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ बूथ अभियान मावळ तालुक्यात राबवले जात आहेत असे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदिप काकडे यांनी सांगितले.मध्यंतरीच्या करोणाच्या काळात कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी झालेल्या नव्हत्या या अभियानांतर्गत कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी होत असून पुन्हा एकदा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पंचायत समिती ,ZP निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. प्रत्येक गावोगावी भारतीय जनता पक्षाचे प्रभारी मंडल अध्यक्ष आघाड्यांचे अध्यक्ष ,महिला आघाडी, पदाधिकारी हे मीटिंग घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
------------------------
0 टिप्पण्या