Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून चांदखेड गावात किरणजी राक्षे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन...

मावळ दि.१५ - आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण कार्यक्रमाच्या माध्यमातून, आज चांदखेड,तालुका मावळ या गावात तालुका संघटनमंत्री श्री किरणजी राक्षे  यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 
     यामध्ये आयुष्मान भारत योजना, उज्वला गॅस योजना, पी एम किसान सन्मान योजना, इत्यादी योजनांचे लाभ नागरिकांना देण्यात आले.
 या प्रसंगी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष श्री गणेशतात्या भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक शामराव राक्षे, महिला मोर्चाच्या कार्याध्यक्षा सुमित्राताई जाधव, अश्विनीताई साठे, वैशालीताई घारे,  चांदखेड गावच्या सरपंच अंजलीताई धावडेकर, गणाध्यक्ष सूर्यकांत सोरटे, पाचाणे गावचे सरपंच नंदू येवले, यादव सोरटे, माजी सरपंच संतोष बांदल, तालुक्याचे सरचिटणीस सुनीलभाऊ चव्हाण व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आदरणीय मोदीजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या