कामशेत दि.१५ -भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळ तालुक्यांमध्ये पंचायत समिती यांच्या माध्यमातून १२००० लसींचे उपकेंद्रांमध्ये वाटप करण्यात आले.
सकाळपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रांवर व उपकेंद्रावर गर्दी केली होती. कामशेत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर, नर्स, सेविका यांना कृतज्ञता म्हणून पुष्प देण्यात आले.
मावळ तालुक्यातील संपूर्ण लसीकरणाचे नियोजन पंचायत समिती मावळ व भारतीय जनता पार्टी मावळ यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्ता शेवाळे, लोकसभा प्रभारी प्रशांत ढोरे ,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, ज्येष्ठ नेते शंकरनाना शिंदे, पंचायत समिती सदस्य सुवर्णा कुंभार ,भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, दिव्याग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे ,कामशेत शहर भाजपा अध्यक्ष मोहन वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे ,सारिका ताई शिंदे ,सुरेश परमार, चंद्रकांत दौडे, सोनू गायकवाड, नितीन गायखे, संतोष कदम, कमलेश निकाळजे, संजय लोणकर, गिरीश रावळ, सखाराम कुंभार,रमेश शिंदे, सदाभाऊ बांगर,अमित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते
______________________
0 टिप्पण्या