कार्ला दिनांक ४- नाणे मावळ कृती समितीच्या वतीने PMRDA च्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ताजे,पिंपळोली व पाथरगाव या गावामध्ये नाणे मावळ PMRDA कृती समितीच्या माध्यमातून प्रारूप आराखड्यातील त्रुटीच्या विरोधात जनजागृतीसाठी व PMRDA बाधित शेतकऱ्यांनी ७/१२ वरील जेवढी नावे असेल त्यांच्या अधिकाधिक हरकती सूचना देण्यासाठी बैठक संपन्न झाली .
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष सचिन येवले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात आरक्षणे टाकण्यात आले. हे आरक्षण समतोल नसुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे .या साठी नाणे मावळ कृती समितीच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरकती नोंदवाव्यात असे म्हंटले या वेळी नाणे मावळ कृती समिती चे सर्व पदाधिकारी, सदस्य व मोठ्या प्रमाणात शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते..
0 टिप्पण्या